Home > News Update > हर घर तिरंगा उपक्रमावरुन निखिल वागळे यांचा सरकारला टोला

हर घर तिरंगा उपक्रमावरुन निखिल वागळे यांचा सरकारला टोला

हर घर तिरंगा उपक्रमावरुन निखिल वागळे यांचा सरकारला टोला
X

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अशी मोहीम घोषित केली आहे. १५ ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशातील नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पण आता या आवाहनावरुन मोदी सरकारवर टीका देखील होऊ लागली आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी यावरुन मोदी सरकारला टोला लगावला आहे, निखिल वागळे यांनी हर घर तिरंगा, सुरूवात तुमच्या शाखांपासून करा, असा उपरोधिक टोला आपल्या फेसबुक पोस्टमधून लगावला आहे.

तर दुसरीकडे डॉ. संग्राम पाटील यांनीही या मोहीमेवरुन मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. "माझे लाडके नेते जवाहरलाल नेहरू यांचा तिरंगा हातात घेतलेला फोटो पाठवत आहे ,ज्यांना सावरकर, गोळवलकर यांचा अभिमान आहे त्यांनी त्यांचा हातात तिरंगा घेतलेला फोटो शेअर करावा" असे आवाहन केले आहे.

एकूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही यावरुन आता टीकाकारांनी लक्ष्य केले आहे.

Updated : 3 Aug 2022 2:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top