Home > News Update > 'विक्रांत' साठी गोळा केलेले पैसे कुणाला दिले? किरीट सोमय्या यांची कबुली

'विक्रांत' साठी गोळा केलेले पैसे कुणाला दिले? किरीट सोमय्या यांची कबुली

विक्रांत साठी गोळा केलेले पैसे कुणाला दिले? किरीट सोमय्या यांची कबुली
X

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विक्रांत जहाज वाचवण्यासाठी २०१३मध्ये जनतेमधून पैसा गोळा केला होता. ही रक्कम तब्बल ५७ कोटी रुपये एवढी होती आणि त्या रकमेचा सोमय्या यांनी अपहार केला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात झाली.

आतापर्यत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे सर्व आरोप फेटाळले होते, तसेच राऊत यांनी पुरावा द्यावा असे आव्हानही दिले होते. पण आता कोर्टातील सुनावणी दरम्यान किरीट सोमय्या यांनी हे पैसे आपण भारतीय जनता पक्षाला दिले होते, अशी कबुली दिली आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. ही रक्कम ५७ कोटी नसून ११ हजार २६४ रुपये होती, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

पण यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अपहार किती रुपयांचा आहे यापेक्षा अपहार झाला आहे, त्यामुळे चौकशीसाठी सोमय्या पितापुत्रांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तसेच त्यांनी जर भाजला पैसे दिले असतील तर यामध्ये ते पैसे कुणाला दिले, त्या पैशांचे काय झाले, त्याचा वापर कशासाठी केला गेला, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे जर इतरही पक्षांनी विक्रांतच्या नावाने पैसे गोळा केले असतील तर त्यांचीही चौकशी होणार असे घरत यांनी म्हटले आहे.

Updated : 11 April 2022 10:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top