Home > News Update > क्रूझ ड्रग्स प्रकरणात CDR काढण्यासाठी 5 लाखांची ऑफर दिल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा दावा!

क्रूझ ड्रग्स प्रकरणात CDR काढण्यासाठी 5 लाखांची ऑफर दिल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा दावा!

क्रूझ ड्रग्स प्रकरणात CDR काढण्यासाठी 5 लाखांची ऑफर दिल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा दावा!
X

क्रूझ ड्रग्स प्रकरणाशी (Cruise Drugs Case) संबंधित मोबाईल सीडीआर आणि प्रभाकर साहील नावाने डुप्लिकेट सीम कार्ड काढण्यासाठी, अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्तींनी आपल्याला 5 लाखांची ऑफरही दिली होती, असा खळबळजनक दावा जळगाव येथील इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी माध्यमांशी बोलताना केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री पत्रकारांशी बोलताना भंगाळे यांनी हा दावा केला आहे .सोबतच आपण याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्याचेही त्यांनी सांगितले. हॅकर मनीष भंगाळे हेच तेच आहेत ज्यांच नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात, दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने चर्चेत आले होते.

भंगाळे यांनी अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्ती आपल्याला 6 ऑक्टोबरला जळगाव येथून भेटल्या असं म्हटलं आहे. त्यांनी माझ्याकडे पूजा दलानीच्या नावाने सेव्ह असणाऱ्या नंबरचा सीडीआर काढून मागितल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी आपल्याला एका व्हाट्सएप चॅटचा बॅकअपही त्यांनी दाखवला. जो आर्यन खान नावाने सेव्ह होता. क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी काळबेर होईल, असा संशय आपल्याला आल्याचे भंगाळे यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या 5 लाखाच्या ऑफर पैकी आपल्याला 10 हजार रुपये दिले. जाताना त्यांनी एक नंबर दिला, जो truecaller वर सॅम डिसुझा या नावाने दिसत आहे. त्या दोघांनी प्रभाकर साईल या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का? असेही विचारले, असा दावाही भंगाळे यांनी केला.

दरम्यान प्रभाकर साईल कोण आहे हे आपल्याला आधी माहीत नव्हतं मात्र , जेंव्हा साईलला टीव्हीवर पाहिल्यानंतर मला या गोष्टी लक्षात आल्या. असे भंगाळे म्हणत आर्यन प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी मला 5 लाखांची ऑफर होती, याबाबत आपण मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून, चौकशीची मागणी केली आहे.जर हे काम मी केले नाही तर इतर कुणीतरी केले असावे अशी आपल्याला शंका असल्याने याबाबत चौकशी व्हायला हवी असं भंगाळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.याबाबत लोकमत ने वृत्त दिले असून याबाबतचा एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.

Updated : 28 Oct 2021 2:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top