Home > News Update > ज्ञानवापीः मस्जिद की मंदीर आज होणार फैसला

ज्ञानवापीः मस्जिद की मंदीर आज होणार फैसला

वाराणसी मधील ज्ञानवापी मस्जिद प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

ज्ञानवापीः मस्जिद की मंदीर आज होणार फैसला
X

वाराणसी मधील ज्ञानवापी मस्जिद प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

काय प्रकरण?

हिंदू पक्षाच्या मते वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद हे जुनं काशीचं मंदीर आहे. औरंगजेबाने हे मंदीर पाडून या ठिकाणी मस्जिद उभा केली. औरंगजेबाने मंदीर पाडल्यानंतर या ठिकाणी मस्जिद च्या बाजूला (सध्या उभं असलेल्या मंदीराचे काम) राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं आहे.

दरम्यान हिंदू पक्षाच्या या दाव्यानंतर मशिदीची देखभाल करणाऱ्या अंजुमन इंतजामिया कमेटीच्या वतीने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या याचिकेत मशिदीमध्ये सुरू असलेल्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची आणि वाराणसीतील कनिष्ठ न्यायालयातील कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता मशिदीतील सर्वेक्षण व व्हिडिओग्राफीचे काम पूर्ण झाले आहे.

मात्र, मुस्लीम पक्षाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या मते सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेलं कामकाज आणि पुरातन सर्वेक्षण विभागाने तयार केलेल्या अहवालाला न्यायालय स्थगिती देऊ शकतं. याचिकेत म्हटले आहे की, वाराणसीतील कनिष्ठ न्यायालयात 2021 मध्ये काही लोकांकडून दाखल करण्यात आलेली याचिका 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन करते आणि वादाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे.

याचिकेत म्हटले आहे की, वाराणसीतील कनिष्ठ न्यायालयात 2021 मध्ये काही लोकांकडून दाखल करण्यात आलेली याचिका 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन करते आणि वादाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. याचिका में कहा गया है कि 2021 में वाराणसी की निचली अदालत में कुछ लोगों द्वारा दायर याचिका 1991 के प्रार्थना स्थल अधिनियम का उल्लंघन करती है और विवाद को पुनर्जीवित करने का प्रयास करती है।

मुस्लीम पक्षाने दाखल केलेल्या याचिकेनुसार वाराणसीतील कनिष्ठ न्यायालयात 2021 मध्ये काही लोकांकडून दाखल करण्यात आलेली याचिका 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. ही याचिका म्हणजे पुन्हा एकदा एक नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

दुसरीकडे आज ज्ञानवापी मशिदेच्या संदर्भात न्यायालयाने नेमलेला पुरातन विभाग आज आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. सर्वेक्षणानंतर हिंदू पक्षाने ज्ञानवापी मशिदीत नंदीसमोर शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे, तर मुस्लिम बाजूने शिवलिंग सापडले नसल्याचे म्हटले आहे. हिंदू पक्षाच्या या दाव्यानंतर न्यायालयाने पोलीस आणि प्रशासनाला शिवलिंगाचे जतन करून जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काशी विश्वनाथ मंदीर आणि मस्जिदच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Updated : 17 May 2022 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top