Home > News Update > Adv. गुणरत्न सदावर्तेंना दणका, दोन दिवसांची पोलिस कोठडी

Adv. गुणरत्न सदावर्तेंना दणका, दोन दिवसांची पोलिस कोठडी

Adv. गुणरत्न सदावर्तेंना दणका, दोन दिवसांची पोलिस कोठडी
X

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. तर या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

उच्च न्यायालयाच्या (High Court) निकालानंतर एसटी कामगारांचा संप मिटण्याची (ST Worker strike) आशा निर्माण झाली असताना कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर चपला फेकून निदर्शने केले. त्यामुळे या संपाला अनिष्ठ वळण लागले. तर या प्रकरणाची गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेत एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna sadavarte) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

Adv. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना किला कोर्टात दाखल करण्यात आले.(Adv. Gunratna sadavarte arrest by gagdev police) यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली होती. तर सदावर्ते यांचे वकील वासवाणी यांनी युक्तीवाद करताना सदावर्ते हा प्रकार घडला त्यावेळी मॅट कोर्टात होते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा युक्तीवाद केली. मात्र 14 दिवसांची पोलिस कोठडी दिल्याशिवाय या प्रकरणाचा पुर्ण तपास करणे शक्य नसल्याचा युक्तीवाद पोलिसांनी केला होता. त्यामुळे अखेर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Gunratna sadavarte's Advocate denied the allegation)

शरद पवार (Sharad pawar) यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, सदावर्ते यांनी कामगारांना चिथावणी देणारे भाषण केले होते. त्यामुळेच कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी निदर्शने करत चपला फेकल्या. त्यामुळे सदावर्ते यांच्याविरोधात कट रचणे, बेकायदा जमाव जमवणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण या गुन्ह्यांखाली अजामीनपत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जे व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. त्यानुसार सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी.

गुणरत्न सदावर्ते यांचे वकील वासवाणी यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, ज्यावेळी शरद पवार यांच्या घरावर कामगारांनी हल्ला केला. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते हे मॅट कोर्टात युक्तीवाद करत होते. तसेच कोणत्याही व्हिडीओमध्ये सदावर्ते असल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे सदावर्ते यांना या प्रकरणात अडकवल्याचा युक्तीवाद वासवाणी यांनी केला.

मात्र दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर किला कोर्टाचे न्यायाधीश कैलाश सावंत यांनी गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे हा सदावर्ते यांना मोठा दणका मानला जात आहे. (two day's Custody for Gunratna sadavarte)

Updated : 9 April 2022 1:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top