Home > News Update > गुलाल आमचाच-विजयापूर्वीच झळकले बॅनर,कोण आहे उमेदवार

गुलाल आमचाच-विजयापूर्वीच झळकले बॅनर,कोण आहे उमेदवार

गुलाल आमचाच-विजयापूर्वीच झळकले बॅनर,कोण आहे उमेदवार
X

पुणे - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल चार जून रोजी लागणार आहेत. मात्र निकालापूर्वीच पुण्यामध्ये विजयी उमेदवारांना शुभेच्छांचे फ्लेक्स झळकू लागले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या बारामती, पुणे, शिरूर या लोकसभा मतदारसंघातील बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सात मे रोजी पार पडली. तर पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया 13 मे रोजी पार पडली. यानंतर लगेचच या तीनही मतदार संघातील उमेदवारांच्या विजयाचे आशय असणारे फ्लेक्स हे पुण्यामध्ये पाहायला मिळाले.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर, आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. "खासदार आमचा पक्का झालाय" , "यंदा गुलाल आमचाच" असे आशय असलेले बॅनर्स पुण्यामध्ये झळकू लागले असून यामध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांना खासादर म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांनी पुण्यातील काही भागांमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे आशय असलेले बॅनर लावले होते. यानंतर महाविकास आघाडी कडून निकाल अजून प्रलंबित असताना अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने शहरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये काँग्रेसचे अमित आबा बागुल यांच्याकडून ही फ्लेक्स बाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा पाचवा टप्पा 20 मे रोजी पार पडणार असून यामध्ये मुंबईच्या सहा जागांसह इतर सात जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र यापूर्वीच महाविकास आघाडी कडून पुणे जिल्ह्याच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. अशा आशयाचे बॅनर लावल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास समोर येत आहे.

Updated : 15 May 2024 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top