Home > News Update > मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का? गुलाबराव पाटील यांनी सांगितलं कारण

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का? गुलाबराव पाटील यांनी सांगितलं कारण

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का? गुलाबराव पाटील यांनी सांगितलं कारण
X

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. त्यामुळे अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होण्याचं कारण गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आणि अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांची खातेवाटप न झाल्याने नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभुमीवर गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होण्याचे कारण सांगितले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, दोघात तिसरा भिडू आल्याने सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, नेत्यांमध्ये नाराजी आहे. याऊलट जे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असं म्हणत मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी हा नवा भिडू आल्यानेच मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Updated : 13 July 2023 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top