Home > News Update > गुजरातमधील शाळेत 'मारो आदर्श नथुराम गोडसे' वकृत्व स्पर्धेचं आयोजन, एक अधिकारी निलंबित..

गुजरातमधील शाळेत 'मारो आदर्श नथुराम गोडसे' वकृत्व स्पर्धेचं आयोजन, एक अधिकारी निलंबित..

गुजरातमधील शाळेत मारो आदर्श नथुराम गोडसे वकृत्व स्पर्धेचं आयोजन, एक अधिकारी निलंबित..
X

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अनेक सरकारी आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी `मारो आदर्श नथुराम गोडसे` या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.यावरुन सरकारच्या एका अधिकाऱ्य़ाला निलंबित करण्यात आले.त्याच्यावर विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

नीताबेन गवळी असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थांनी या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला, त्यांना बक्षिसेही देण्यात आली. गुजरात सरकारच्या युवा सेवा आणि सांस्कृतिक विभागांतर्गत जिल्हास्तरीय बाल प्रतिभा शोध स्पर्धा अंतर्गत विद्यालय या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शाळेच्या अधिकऱ्य़ांनी सांगितले की हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केवळ त्यांना जागा दिली होती. शाळेतील कोणीही त्यात भाग घेतला नाही.

या स्पर्धेचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल होत असताना जिल्हा शिक्षण कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केल्याच्या दावा केला.आम्हाला कार्यक्रमाची माहिती नव्हती कारण ती जिल्हा विकास कार्यालयाने आखली होती आणि त्याची अमंलबजावणी केली होती.युवा विकास कार्यालयाने ८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व २५ सरकारी आणि खासगी शाळांना पत्र पाठवले होते आणि १४ फेब्रुवारी रोजी वलसाड येथील तिथल रस्त्यावरील कुसुम विद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थांनी सहभाग घ्यावा, अशी मागणी केली होती.असे जिल्हा शिक्षण अधिकारी बी डी बरैया म्हणाले.

जिथे हा कार्यक्रम झाला.तिथे हे समर्पण धर्मादाय संस्था चालवणारी उच्च माध्यमिक शाळा आहे.या कार्यक्रमात एकही विद्यार्थी किवा शिक्षक सहभागी झाला नाही.आम्हाला जिल्हा युवा विकास कार्यालयाकडुन स्पर्धेसाठी आमच्या वर्गखोल्या देण्याचे पत्र मिळाले. असे कुसुम विद्यालयाचे विश्वस्त विवेक देसाई म्हणाले.

Updated : 17 Feb 2022 11:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top