Home > News Update > पालक मंत्र्यांना पालकत्वाचा विसर ;रविंद्र चव्हाणांची बालमृत्यूकडे पाठ

पालक मंत्र्यांना पालकत्वाचा विसर ;रविंद्र चव्हाणांची बालमृत्यूकडे पाठ

पालक मंत्र्यांना पालकत्वाचा विसर ;रविंद्र चव्हाणांची बालमृत्यूकडे पाठ
X

पालघरमधील कुपोषण मृत्युंमुळं महाराष्ट्र हादरला असताना पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मात्र या घटनेकडे अक्षरशःपाठ फिरवली आहे.शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी प्रचार सभांचा धडाका पालकमंत्री चव्हाणांनी लावला असताता यामुळे मंत्री म्हणून नको पण जिल्ह्याचे पालक म्हणून तरी या बालमृत्यू घटनेची दखल घ्या, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.

पालघर तालुका आणि कुपोषण हे समीकरण काही केल्या संपत नसल्याचेच आता समोर येत असून तालुक्यातील सावर्डे या ठिकाणी काहि दिवसांपूर्वीच अवघ्या १० दिवसांच्या आत २ बालकांचा मृत्यू झाला यावेळी सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली यावेळी जि.प. अध्यक्ष प्रकाश निकम या भागाचे आमदार सुनिल भुसारा, समाजकल्याण सभापती रोहिणी शेलार खासदार राजेंद्र गावीत या सर्वांनी या घटनेची दखल घेवून या पिडीत कुटुंबाची भेट घेतली.मात्र याभागाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मात्र या घटनेकडे अक्षरशःपाठ फिरवल्याचे चित्र असून दुसरीकडे मात्र सध्या सुरू असलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मात्र प्रचार सभांचा धडाका लावल्याचे दिसुन येत आहे यामुळे मंत्री म्हणून नको पण जिल्ह्याचे पालक म्हणून तरी या बालमृत्यू घटनेची दखल घ्या अशी आर्त हाक आदिवासी बांधव देत आहेत.

मोखाडा तालुक्यात यामागेही अनेकदा कुपोषणा बाबतच्या अनेक घटना समोर आल्या यावेळी तत्कालीन सरकारचे आरोग्यमंत्री पालकमंत्री दुसऱ्याच दिवशी घटनास्थळी हजर होत होते सावर्डे मधील या प्रकरणात मात्र आरोग्यमंत्री महिला व बालकल्याण मंत्री सोडा या जिल्हाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण अद्या फिरकलेच नाही याबाबत आदिवासी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.मुळात अशा घटनांकडे किमा लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या प्रतिनिधीनी गांभीर्याने बघणे गरजेचे आहे मात्र एकप्रकारे जिल्हाचे पालकम म्हणवणारे मंत्रीच जर अशा ठीकाणी साधी भेट द्यायलाही यांना वेळ नसेल तर जिल्हा पोरका झाल्याशिवाय राहणार या उलट पालकमंत्री चव्हाण हे सध्या सुरू असलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत मात्र अग्रेसर असून यासाठी प्रचाराचा धडाका लावला आहे म्हणजे प्रचारासाठी वेळ आहे मात्र मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना भेटायला मात्र वेळ नसल्याने आशर्य व्यक्त होत आहे.

यामुळे जर जिल्हाचे पालकमंत्रीच कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यु याबाबतीत गंभीर नसतील तर मग कुपोषण थांबवण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांकडुन काय अपेक्षा धरावी हा खरा सवाल यानिमित्ताने उभा राहत आहे पालकमंत्री हे राज्यशासनातील मंत्री त्यांना धोरणात्मक निर्णय घ्यायला संधी असते यामुळे या घटनेची दखल त्यांनी घ्यावी अशी सहाजिकच अपेक्षा असते मात्र तसे होत नसल्याने राजाने हाकलले अन पावसाने झोडपले तर जायचे कुठे? हा प्रश्न आहे.

Updated : 21 Jan 2023 6:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top