आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

कोरोनाच्या (corona) संकटामुळे रखडलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मंजुरी दिली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी गुरूवारी राज्यपालांची भेेट घेऊन आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा आराखडा सादर केला.

परीक्षांसंदर्भात ३ प्रस्ताव

1. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जूलै ते १५ ऑगष्ट या कालावधीत घेण्यात येतील.

2. कोरोनाच्या परिस्थितीमुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परिक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल.

३. वरील दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल आणि त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील.