News Update
Home > News Update > राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसीय अहमदनगर दौऱ्यावर

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसीय अहमदनगर दौऱ्यावर

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसीय अहमदनगर दौऱ्यावर
X

शिर्डी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे दोन दिवसीय अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज लोणी येथील हेलीपॅडवर त्यांचे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी, प्रवरा इन्स्स्टियुट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.व्ही.एन.मगरे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस दलातर्फे राज्यपाल कोश्यारी याना मानवंदना देण्यात आली. आगमनानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी लोणी येथील प्रवरा रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पीटलच्या भूमिपूजन समारंभासाठी मार्गस्थ झाले.

उद्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हिवरे बाजार, राळेगणसिद्धी येथे भेट देणार आहेत.

Updated : 2021-10-27T12:23:46+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top