Home > News Update > राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
X

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय ध्वजवंदन केले.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार शरद रणपिसे, आमदार भीमराव तापकीर, आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह अधिकारी- पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 15 Aug 2021 5:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top