Home > News Update > अखेर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सरकारचा निर्णय

अखेर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सरकारचा निर्णय

अखेर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सरकारचा निर्णय
X

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर सर्व शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पण अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घ्यावा याबद्दल गेल्या दोन महिन्यांपासून बरीच चर्चा आणि वाद विवाद झाले.

राज्य सरकारने अखेर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात आणि मुलांच्या वर्षभरातील कामगिरीनुसार त्यांचे मूल्यमापन करून त्यांना मार्क देण्यात यावेत, असा निर्णय घेतला. पण राज्यपालांनी सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेतला आणि परीक्षा घेण्यात याव्यात असे आदेश दिले. पण अखेर राज्य सरकारने अंतिम परीक्षां बाबत निर्णय घेतला असून या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांना ती देता येणार आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. पण एकूणच राज्यपालांनी अशा निर्णयाला विरोध केलेला असतानाही सरकारने आता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने येत्या काळात राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे

Updated : 20 Jun 2020 3:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top