Home > News Update > Covid-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना 5 लाख रुपयांची सरकारची आर्थिक मदत, कसा अर्ज कराल?

Covid-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना 5 लाख रुपयांची सरकारची आर्थिक मदत, कसा अर्ज कराल?

Covid-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना 5 लाख रुपयांची सरकारची आर्थिक मदत, कसा अर्ज कराल?
X

कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये अनेक जणांचे मृत्यू झाले. अनेक मुलं आई वडील दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनात झाली. या मुलांचं पालकत्व कोण करणार असा प्रश्न निर्माण होत होता. यावर जुन २०२१ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला.

या निर्णया अंतर्गत ज्या मुलांच्या आई-वडीलांचे कोरोनामुळे निधन झाले असेल त्या मुलांच्या नावाने बँक खात्यात शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांची रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येत आहेत. या मुलांना ही रक्कम वयाची एकवीस वर्षे पूर्ण केल्यानंतर व्याजासकट दिली जाणार आहे त्यामुळे या आपत्ती काळात दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना आता अर्थसहाय्य मिळणार आहे.

या योजने अंतर्गत आतापर्यंत ६०० बालकांच्या नोंदी झाल्या आहेत. यापैकी ३०६ बालकांच्या खात्यात प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे आतापर्यंत १५ कोटी ३० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत बालकांच्या खात्यात देखील हा निधी लवकरच जमा होणार आहे. आतापर्यंत गोंदिया, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सोलापूर, रायगड, अलीबाग, रत्नागिरी, नाशिक, अमरावती, पुणे आणि नागपूर अशा विविध २४ जिल्ह्यांमधील बालकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

या योजनेसाठी नेमकं काय करावे लागणार आहे हे आता आपण पाहणार आहोत सर्वात आधी ज्या मुलांचे आईवडील असे दोन्ही पालक मृत पावले असतील अशा मुलांच्या नातेवाइकांनी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सदर मुलांच्या पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन सदर योजनेचा अर्ज मागायचा आहे. तो अर्ज भरून कार्यालयामध्ये द्यायचा आहे. यानंतर शासनातर्फे दिलेली माहिती तपासली जाईल आणि माहिती तपासणी केल्यानंतर शासनातर्फे संबंधीत मुलांच्या नावे पाच लाख रुपयांची मदत बँकेच्या खात्यात जमा केली जाईल. या मदतीचा फायदा संबंधित मुलांना वयाची एकवीस वर्षे पूर्ण केल्यानंतरच मिळणार आहे. एकदा वयाची २१ वर्षे पूर्ण केली की व्याजासकट ही रक्कम त्या मुलांना मिळणार आहे. वय वर्ष २१ खालील मुलं या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Updated : 13 Oct 2021 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top