Home > News Update > पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
X

मुंबई - पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील महापालिकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती ठरवण्यासाठी करण्याबाबत नगरविकास विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या महासभेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा ठराव १० मार्च २०२१ रोजी केला होता. सदरचा ठराव महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता.

Updated : 16 Sep 2021 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top