Home > News Update > गोरेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे खपवुन घेणार नाही-श्रीदेवी पाटील

गोरेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे खपवुन घेणार नाही-श्रीदेवी पाटील

गोरेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे खपवुन घेणार नाही-श्रीदेवी पाटील
X

हिंगोली : गोरेगांव पोलिस स्टेशनच्या नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी नुकताच हिंगोली जिल्ह्यातील गोरेगांव पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या रूपाने गोरेगांव पोलीस स्टेशनला महिला ठाणेदार मिळाली आहे.

त्यांचा गोरेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत ठिक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने सध्या सत्कार करण्यात येत असून आज आजेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभावेळी त्यांनी गोरेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे करणाऱ्यांना सज्जड दम दिला तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे खपून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले व असे अवैध धंदे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती श्रीदेवी पाटील यांनी दिला.

Updated : 31 Aug 2021 4:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top