Home > News Update > डॉ. कमल रणदिवे यांना Google कडून Doodle च्या माध्यमातून मानाचा मुजरा

डॉ. कमल रणदिवे यांना Google कडून Doodle च्या माध्यमातून मानाचा मुजरा

डॉ. कमल रणदिवे यांना Google कडून Doodle च्या माध्यमातून मानाचा मुजरा
X

मुंबई : मराठमोळ्या डॉ. कमल रणदिवे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त आज Googleनं त्यांना अनोख्या पद्धतीनं मानाचा मुजरा केला आहे. गुगलनं Doodle च्या माध्यमातून बायो मेडिकल संशोधक असलेल्या डॉ. कमल रणदिवे यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ रणदिवे यांचं कॅन्सरवरील संशोधन अतिशय महत्वाचं ठरलं होतं. त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

डॉ. कमल जयसिंग रणदिवे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील दिनकर दत्तात्रेय समर्थ आणि आई शांताबाई दिनकर समर्थ.डॉ. कमल रणदिवे यांचे वडील दिनकर हे पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजात प्राध्यापक होते. डॉ. कमल रणदिवे यांनी आपलं शिक्षण फर्ग्यूसन कॉलेजमधून पूर्ण केलं, त्यांनी कृषी महाविद्यालयातून एमएससी केली. त्यांनी 3 मे 1939 रोजी गणित तज्ञ जे. टी. रणदिवे यांच्याशी लग्न केलं.

डॉ. रणदिवे यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम केलं. सोबतच त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी घेतली. डॉ. रणदिवे या भारतीय महिला वैज्ञानिक संघ (IWSA) च्या संस्थापक सदस्य होत्या. डॉ. रणदिवे यांनी स्तन कॅन्सर आणि अनुवांशिकता यांचा परस्पर संबंध असल्याचा पहिला प्रस्ताव मांडला होता. याबाबत अनेक संशोधकांनी देखील दुजोरा दिला आहे.

1960च्या दशकात त्यांनी मुंबईत भारतीय कॅन्सर संशोधन केंद्रात भारतातील पहिली प्रयोगशाळा सुरु केली. त्यांचे मार्गदर्शक डॉ. वी. आर. खानोलकर हे भारतीय कॅन्सर संशोधन केंद्र (आयसीआरसी) चे संस्थापक होते. डॉ. कमल रणदिवे यांचं हे योगदान गुगलनं डूडलच्या माध्यमातून जगासमोर आणलं आहे.

Updated : 8 Nov 2021 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top