Home > News Update > आनंदाची बातमी; अखेर मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश

आनंदाची बातमी; अखेर मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश

आनंदाची बातमी; अखेर मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश
X

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वजण डोळे लावून बसले होते. मात्र भारतीय हवामान विभागाने अत्यंत दिलासादायक बातमी देत मान्सून राज्यात दाखल झाला असल्याचे म्हटले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून उत्तर भारतातून येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे मान्सूनचा प्रवास थांबला होता. त्यामुळे पेरणीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. तर मान्सून किती काळ लांबणार? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने अधिकृतरित्या महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, असे म्हटले जात आहे.




भारतीय हवामान विभागाने 10 जून रोजी मान्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे. तर आता मान्सूनने गोव्याची सीमा ओलांडून दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नियोजित वेळेच्या दोन दिवस राज्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. तर या वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनने 29 मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर उत्तर भारतातून आलेल्या उष्ण लाटेमुळे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचा फटका मान्सूनला बसला म्हणून मान्सूनचा वेग मंदावला होता. तर त्यानंतर 31 मेपर्यंत मान्सूनने कर्नाटकमधील कारवारपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग पुर्णपणे थांबला. तर 9 जून रोजी मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने मान्सूनने गोवामार्गे दक्षिण कोकणातील वेगुर्ल्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृत प्रवेश केल्याने राज्यासाठी आनंदाची बातमी आहे.


Updated : 6 Sep 2022 11:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top