Home > News Update > शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर; राज्यात 21 हजार 678 पदांसाठी होणार भरती

शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर; राज्यात 21 हजार 678 पदांसाठी होणार भरती

शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर; राज्यात 21 हजार 678 पदांसाठी होणार भरती
X

राज्यात गेल्या काही महिन्यापासून शिक्षकभरतीची मोठ्या अतूरतेने वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आली आहे. शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर जाहीरात प्रसिध्द करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांमधील 21 हजार 678 रिक्त जागांवर शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या १२ हजार ५२२, राज्यातील १८ महापालिकेच्या २ हजार ९५१, ८२ नगरपालिका आणि परिषदेच्या ४७७ तसेच १ हजार १२३ खासगी शैक्षणिक संस्थांच्या ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ शिक्षकांची रिक्त पदांवर भरती होणार आहे. १६ हजार ७९९ पदे मुलाखतींशिवाय तसेच ४ हजार ८७९ पदे मुलाखत घेऊन भरण्यात येणार आहेत.

माध्यमनिहाय मराठी १८ हजार ३७३, इंग्रजी १९३१, उर्दू-१८ १८५०, हिंदी ४१०, गुजराथी १२, कन्नड ८८, तामिळ ८, बंगाली ४, तेलुगू -२ याप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येतील, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.असा करा प्राधान्यक्रम जनरेट उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल दिले आहे. तसेच,उमेदवारांना एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी https://tait२०२२.mahateacherrecrui tment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे आदींबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर संपर्क करावा.

Updated : 7 Feb 2024 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top