Home > News Update > चाकरमाण्यासाठी खुशखबर! कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गे जाण्याऱ्यांसाठी टोलमाफी

चाकरमाण्यासाठी खुशखबर! कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गे जाण्याऱ्यांसाठी टोलमाफी

चाकरमाण्यासाठी खुशखबर! कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गे जाण्याऱ्यांसाठी टोलमाफी
X

कोकणातील गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र सुरु आहे. मुंबईतील अनेक चाकरमाणी हे मोठ्या संख्येने गणपतीला कोकणात दाखल होत असतात याच पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिंदे गटाकडून मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. शनिवार (20 ऑगस्ट) रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये यासंदर्भात बैठक पार पडली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. दरवर्षी मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated : 20 Aug 2023 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top