Home > News Update > शेतकऱ्याच्या घामाने पिकवलेलं अन्न धान्य फाटलेल्या पोत्यात...!

शेतकऱ्याच्या घामाने पिकवलेलं अन्न धान्य फाटलेल्या पोत्यात...!

शेतकऱ्याच्या घामाने पिकवलेलं अन्न धान्य फाटलेल्या पोत्यात...!
X

गोंदिया जिल्ह्यातील देवरी आदीवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत शेतकऱ्यांचे धान्य घेण्याकरिता महामंडळाकडून पोते देण्यात येत असतात. मात्र, या वर्षी निकृष्ट दर्जाचे पोते पुरवत असल्याचं धक्कादायक बाब निदर्शनात आली आहे. त्यामुळे अन्न धान्य सुरक्षेबाबत प्रशासन किती निष्काळजी आहे. ही गंभीर बाब समोर आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका नक्षलग्रस्त असून आदीवासी बहुल क्षेत्र असल्याने या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळ यांचे कार्यालय आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून या परिसरात धान्य खरेदी केंद्र सुरु केले जाते. शेतकऱ्यांकडून त्यांच्या धान्याची खरेदी महामंडळ करीत असते. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान्य ठेवण्यासाठी पोते पुरवठा करण्यासाठी ऑनलाईन टेंडरिंग केली जाते.

दरवर्षी 20 रूपये 87 पैसे दरांनी जवळपास 20 लाख पोती या महामंडळाला पुरविली जातात. जवळपास 4 कोटी रुपयाचा या पोत्यावर खर्च केला जातो. 2019-20 या चालू वर्षाचा टेंडर बालाजी कॉर्पोरेशन गोंदिया यांना मिळाला आहे. बालाजी या कंपनीने अत्यंत निकृष्ट दर्जाजी फाटलेली पोती महामंडळाला दिली असल्याचं निदर्शनात आले आहे. त्यात त्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे.

त्यामुळे या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करून त्याच्यावर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्यात यावं असा अहवाल आदीवासी विकास महामंडळ नाशिक यांना पाठविणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. असं असले तरी घामाने पिकविलेले धान्य सुरक्षित कसे ठेवावे? असा प्रश्न आता समोर आला आहे.

Updated : 19 Nov 2019 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top