Home > News Update > सोन्याचा भाव विक्रमी वाटचलीकडे:अमेरिका युरोपातील बंद बँकेचा परिमाण

सोन्याचा भाव विक्रमी वाटचलीकडे:अमेरिका युरोपातील बंद बँकेचा परिमाण

सोन्याचा भाव विक्रमी वाटचलीकडे:अमेरिका युरोपातील बंद बँकेचा परिमाण
X

सोन्याच्या भावात अतिशय वेगाने चढउतार होत असल्याने आठवड्याभरात 3000 हजारांनी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या भाव प्रति 10 ग्राम साठी 58400 रुपये भाव आहे.तर चांदी 69000 प्रति किलोचा दर आहे.

जळगाव सराफा बाजारात काल प्रति तोळा ( 10 ग्राम ) 58800 रुपये भाव होता. तर आज सकाळी सराफा बाजार 58400 पर्यंत आला आहे. गेल्या आठवढ्यात सोन्याचा भाव 55000 हजारांच्या आसपास होता मात्र एका आठवढ्यात सोने भावात 3000 ते 35000 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोने दर वाढीचे कारण- सोने दर वाढीचे कारण दोन अमेरीका बँक बुडणे, युरोप मधील 5 बँका बंद पडणे. तसेच स्वीच क्रेडिट स्वीच होण्याबाबतच्या अफवांमुळे सोने दरात उसळी आल्याचं जाणकार सांगत आहे.तसच शेअर मार्केटही खाली आल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचं जाणकार सांगत आहे.

चालू आठवढ्यातच सोन्याचे भाव वाढले आहेत.दरम्यान सोन्याचे आणखीन भाव वाढतील म्हणजेच 60,000 पर्यंत जातील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.यामुळे भारतातील ऐन लग्न समारंभाच्या हंगामात सर्वसामान्यांना मोठा फटका आहे.

Updated : 17 March 2023 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top