Home > News Update > सोन्याचे दर वाढतच राहणार,SIP करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

सोन्याचे दर वाढतच राहणार,SIP करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

सोन्याचे दर वाढतच राहणार,SIP करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
X

22 एप्रिल रोजी सोन्याची किंमत प्रति तोळा एक लाख रुपयांवर पोहचलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात झालेला व्यापारी समझोता तसेच गाझा पट्टीतील इस्त्रायल-पॅलेस्टीन तसेच रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता

दीर्घकालावधीचा विचार केल्यास सोन्यातून चांगला परतावा मिळेल,असा अंदाज रिसर्च अॅनालिस्टनी व्यक्त केलाय

सोन्याच्या वाढलेल्या किंमतीबरोबरच महिलांच्या सोनं खरेदीचंही अनेक जणांनी कौतुक केलंय

दागिने आणि नाण्याच्या रूपात महिला सोन्याची खरेदी करत असतात. विशेषत: साडेतीन मुहूर्तावर तर सोन्याची खरेदी

करण्याकडे अनेक महिलांचा कल दिसून येतोय. अक्षय तृतीयेला खरेदी केलेल्या सोन्यानं १३.७ टक्क्यांपासून ३४.३ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिलाय

दीर्घकालावधीचा विचार केल्यास सोन्यातून सुमारे २५ टक्के परतावा मिळालाय. त्यामुळेच सोनं खरेदीकडे महिला प्राधान्य देताना दिसून येतात

वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलने भारतातील महिलांकडे सुमारे २४ ते २५ हजार टन सोनं असल्याची माहिती दिलीय

जगाचा विचार करता भारतात दागिन्याच्या स्वरूपात जवळपास ११ टक्के सोनं महिलांकडे आहे. सोन्याच्या साठ्याबाबत महिलांनी

अमेरिका,आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफ,स्विझर्लंड,जर्मनी या देशांनाही मागे सोडलंय.

सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यानं गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्डचा पर्ययही पुढे आलाय

फिजिकल सोनं सांभाळण्यात अडचणी येत असल्यानं अनेक जण आता गो्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्डमध्य गुंतवणूक करत आहेत.

गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओत किमान दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत सोन्यात गुंतवणूक करावी असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात.

एकूणच जागतिक संकट असो की महागाई सोन्यानं चांगला परतावा दिलाय त्यामुळे सोन्यात SIP करण्याचा सल्लाही गुंतवणूक सल्लागारांनी दिलाय. .

Updated : 12 Jun 2025 8:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top