Home > News Update > सोने खरेदी करणारांसाठी योग्य वेळ…

सोने खरेदी करणारांसाठी योग्य वेळ…

सोने खरेदी करणारांसाठी  योग्य वेळ…
X

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची वाढ, महागाई, आणि बँकांच्या व्याजदर वाढीमुळे देशात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात 58,800 प्रति तोळा सोन्याचा विक्रमी पातळीवर पोहचला होता, त्यानंतर सोने भावात सातत्याने चढउतार सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यापासून 24 कॅरेट सोन्याच्या भावात आतापर्यंत 3000 रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 24 कॅरेट साठी 55,500 रुपये प्रति तोळा, तर 21 कॅरेट साठी 51,500 रुपये प्रति तोळा भाव खाली आला आहे.

चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. 63000 रुपये प्रति किलो चांदीचे आजचे भाव आहेत. गेल्या तीन आठवड्यात चांदीचे भाव प्रति किलो 68000 ते 69000 रुपयांपर्यंत भाव पोहचले होते आज चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

अजून घसरण होणार

सोन्याच्या भावात अजून घसरण होणार आहे.53000 पर्यंत भाव खाली येतील असे जळगावातील सोने व्यापाऱ्यांच् म्हणणं आहे. सोने खरेदी करणारांसाठी योग्य वेळ… खोंडे ज्वेलर्स चे संतोष खोंडे यांनी सांगितलं की डॉलरची किंमत सतत वाढत आहे तसेच बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे यामुळे सोने भाव घसरण झाली आहे आणखीन भाव कमी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. सोने चांदी भावाचे जाणकार स्वरूप कुमार लुंकड यांनी सांगितलं की केंद्र सरकारने सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवल्याने त्याचा परिणाम ही सोने भावात परिणाम झाल्याचं मत व्यक्त केलंय.

Updated : 28 Feb 2023 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top