Home > News Update > सुवर्णभरारी: सोने आता जगातील दुसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी राखीव संपत्ती

सुवर्णभरारी: सोने आता जगातील दुसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी राखीव संपत्ती

सोन्याने युरोलाही टाकलं मागं

सुवर्णभरारी: सोने आता जगातील दुसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी राखीव संपत्ती
X

युरोला मागे टाकत सोने आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राखीव संपत्तीचे साधन बनले आहे.

जगभरातील केंद्रीय बँकांनी विक्रमी प्रमाणात सोने खरेदी केल्यामुळे आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे हा मोठा बदल घडून आला आहे,अशी माहिती युरोपियन सेंट्रल बँकेने दिली आहे. अमेरिकन डॉलर अजूनही सर्वात मोठा राखीव संपत्ती आहे.

भूराजकीय अस्थिरतेमुळे गेल्या तीन वर्षांपासून जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. चीन,भारत,तुर्केये आणि पोलंडमधील मध्यवर्ती बँका मोठया प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. २०२४ मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी एक हजार टनांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी केली आहे. महागाई वाढली असताना सोन्यातील गुंतवणूक ही महागाईपासून संरक्षण देते. त्यामुळे सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरातील अस्थिर भूराजकीय परिस्थिती ही सोन्याचे दर वाढण्यासाठी पूरक आहे.

Updated : 12 Jun 2025 7:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top