Home > News Update > सोने 64 हजारावर तर चांदीचे दर 80 हजारावर

सोने 64 हजारावर तर चांदीचे दर 80 हजारावर

सोने 64 हजारावर तर चांदीचे दर 80 हजारावर
X

गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या भावात ऐतिहासिक उंचाकी वर पोहवले आहेत.आज जळगाव सरांफा बाजारात प्रति तोळा सोन्याला तीन टक्के GST सह 64.200 रुपये भाव आहे तर चांदी प्रति किलो 80.000 हजारावर पोहचली आहे.

काल सोने बाजार सुरु झाल्यावर विक्रमी भाव वाढ पाहायला मिळाली. प्रति तोळा सोने,

प्रति किलो मागे चांदीच्या दरात तेजी सुरुच आहे. सोन्याचे दर सोमवारी तीन टक्के जीएसटीसह 66,200 रुपये तोळा होते. आजपर्यंतचा हा उच्चांकी भाव आहे. तर चांदीने आतापर्यंतच्या उच्चांकी 80,300 रूपये किलो पर्यंत पोहचेलें.

अमेरिकन फेडरलने जाहिर केलेल्या बेरोजगारीच्या अहवालानंतर शनिवारी रविवार आणि सोमवारी सोने चांदीच्या दरात भावात मोठी तेजी पाहायला मिळाली.

सोमवारी रविवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 529 रुपयांची वाढ नोंदवत सोने दराने नवा उच्चांकी 66,200 रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला. चांदीचे प्रती किलोचे दर शनिवारी 79,800 होते. त्यात 500 रुपयांची वाढ होवून ते तीन टक्के GST सह 80,300 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. काल च्या तुलनेत आज एक हजारांनी सोन्याचा भाव घसरला आहे.

दरम्यान येत्या काही दिवसात सोन्याचे भाव 68,000 प्रयत्न जाण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

चार राज्यांच्या निकाल भाजप च्या बाजूने लागल्याने शेअर मार्केट मध्येही विक्रमी तेजी आल्याचं जाणकारांच म्हणणं आहे.


Updated : 5 Dec 2023 5:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top