Home > News Update > गोद्री येथे होणारे बंजारा महाकुंभ म्हणजे संघ आणि भाजपाचे राजकीय षडयंत्र – देवानंद पवार

गोद्री येथे होणारे बंजारा महाकुंभ म्हणजे संघ आणि भाजपाचे राजकीय षडयंत्र – देवानंद पवार

गोद्री येथे होणारे बंजारा महाकुंभ म्हणजे संघ आणि भाजपाचे राजकीय षडयंत्र – देवानंद पवार
X

जळगाव येथील गोद्री गावात गोर बंजारा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह देशातील आठ राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजन समितीने दिली आहे. मात्र, या महाकुंभाला बंजारा समाजातून विरोध होत आहे. पोहरादेवी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गोर बंजारा महाकुंभ संघ आणि भाजपाचे षडयंत्र आहे असे काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, आमदार राजेश राठोड, बलदेव महाराज, महाराज, मधुकर जाधव, पंजाबराव चव्हाण, अमोल पाटील, इफ्तेखार पटेल, प्रकाश राठोड, राजेश चव्हाण जालनेकर उपस्थित होते.

दरम्यान, बंजारा समाजाची देशभरात भाषा, संस्कृती, वेशभूषा, चालीरिती एकच आहे. बंजारा समाज हा सनातनी नसून निसर्गपूजक आहे. राजकारण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, धर्माच्या नावाने कुणी पोहरादेवीच अस्तित्व संपवू पाहत असेल तर हे कदापी खपवून घेतले जाणार नाही. पोहरादेवीची ओळख पुसण्याचे काम संघ आणि भाजपने करु नये अन्यथा बंजारा समाज भाजप- संघाविरुद्ध तीव्र भूमिका घेईल असे यावेळी देवानंद पवार म्हणाले.

Updated : 5 Dec 2022 12:47 PM GMT
Next Story
Share it
Top