Home > News Update > डिसले गुरूजी पुन्हा वादात, अधिकाऱ्यांवर खोटे आरोप केल्याची कबुली

डिसले गुरूजी पुन्हा वादात, अधिकाऱ्यांवर खोटे आरोप केल्याची कबुली

डिसले गुरूजींच्या रजेसाठी झालेल्या हाय होल्टेज ड्रामानंतर शिक्षणमंत्र्यांनी डिसले गुरूजींना रजा मंजूर केली. मात्र त्यांनी कागदपत्रांची पुर्तता न करताच त्यांची रजा मंजूर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डिसले गुरूजी पुन्हा वादात, अधिकाऱ्यांवर खोटे आरोप केल्याची कबुली
X

ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरूजी यांनी अमेरीकेतील विद्यापीठात पी. एचडी करण्यासाठी प्रदीर्घ अध्यापन रजेसाठी अर्ज केला होता. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी अपुऱ्या कागदपत्राअभावी रजेचा अर्ज फेटाळला. मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर थेट शिक्षणमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत डिसले गुरूजींना रजा मंजूर केली. मात्र शिक्षणमंत्र्यांनी रजा मंजूर केल्याच्या आठ दिवसानंतरही डिसले गुरूजींनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

डिसले गुरूजींना शिक्षणमंत्र्यांनी रजा मंजूर केली. मात्र अमेरीकेतील विद्यापीठाचे प्रवेश मिळाल्याचे पत्र, फुलब्राईट अभ्यास शिष्यवृत्तीचे पत्र डिसले गुरूजींना अजूनही शिक्षण खात्याकडे जमा केले नाही. तर शिक्षणाधिकाऱ्यांवर केलेले आरोप भावनेच्या भरात केल्याचे रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेला लेखी स्वरूपात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरूजींना 153 दिवस रजा मंजूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र त्यानंतरही डिसले यांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. तर डिसले हे कोणत्या संशोधनासाठी अमेरीकेत जाणार आहेत, विषय कोणता आहे यासह विद्यापीठातील प्रवेशाचे कोणतेही पत्र शिक्षणखात्याला दिले नाही, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. तर याबाबत डिसले यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यावरून डिसले गुरूजींनी स्वामी यांची दोन वेळा भेट घेतली. यावेळी तुम्ही लेखी तक्रार का केली नाही, असे स्वामी यांनी डिसले यांना विचारले. तेव्हा डिसले यांनी लेखी पत्रातून सांगितले की, शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्याविषयी चुकीचे विधान केल्याने भावनेच्या भरात शिक्षणाधिकाऱ्यांवर आरोप केल्याचे स्वामी यांनी सांगितले.

त्यामुळे डिसले यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने व शिक्षण खात्यावर बिनबुडाचे आरोप केल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. तर नैसर्गिक न्यायतत्वावर डिसले यांची शिक्षणाधिकारी चौकशी करतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे डिसले हे रजेसाठी खोटे बोलल्याचे उघड झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Updated : 3 Feb 2022 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top