Home > News Update > जगभरातील कोरोना बळींची संख्या दीड लाखांच्यावर

जगभरातील कोरोना बळींची संख्या दीड लाखांच्यावर

जगभरातील कोरोना बळींची संख्या दीड लाखांच्यावर
X

संपूर्ण जगात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. सुमारे २०० देशांमध्ये आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या २२ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. तर कोरोनामुळे दीड लाखांच्यावर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ३२ हजारांवर पोहोचली आहे. तर ३८ हजार ६६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत १५ हजारांच्यावर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनाबळींची संख्या २३ हजारांच्यावर पोहोचली आहे.

दरम्यान ज्या चीनमधील कोरोनाचा उद्रेक झाला तिथल्या कोरोना बळींची संख्या ४ हजार ६०० च्यावर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनने कोरोना बळींची संख्या साडे तीन हजारांच्या आसपास असल्याचं दाखवलं होतं. पण गेल्या दोन दिवसात ही संख्या वाढून आता साडे चार हजारांवर पोहोचली आहे.

Updated : 19 April 2020 2:01 AM GMT
Next Story
Share it
Top