Home > News Update > #कोरोनाशी लढा – जगभरात आतापर्यंत 25 लाख 77 हजार रुग्ण कोरोनामुक्त

#कोरोनाशी लढा – जगभरात आतापर्यंत 25 लाख 77 हजार रुग्ण कोरोनामुक्त

#कोरोनाशी लढा – जगभरात आतापर्यंत 25 लाख 77 हजार रुग्ण कोरोनामुक्त
X

संपूर्ण जग ठप्प करुन टाकणाऱ्या कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांची जागतिक संख्या आता 59 लाखांच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 61 हजार 776 झाली आहे.

वर्ल्डोमीटर या संस्थेच्या आकडेवारीनुसार जगातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांपैकी 25 लाख 77 हजार 247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता जगात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 29 लाख 61 हजार 886 आहे.

यापैकी फक्त 2 टक्के म्हणजे सुमारे 53 हजार रुग्णांची प्रकृती गंभीर असून उर्वरित 29 लाख 7 हजार रुग्णांची परिस्थिती सामान्य आहे. दरम्यान जगातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या अमेरिकेत 17 लाख 68 हजार लोकांना बाधा झाली. यापैकी 1 लाख 3 हजार 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाखांच्या जवळ पोहोचली आहे.

Updated : 29 May 2020 1:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top