Home > News Update > जगातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटींच्या वर

जगातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटींच्या वर

जगातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटींच्या वर
X

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूची बाधा जगातील एकूण 1 कोटींच्यावर लोकांना झाली आहे. आतापर्यंत 1 कोटी 35 लाख 7 हजार 662 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

तर 5 लाख 8 हजार 55 रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार गेल्या 24 तासात जगभरात 1 लाख 63 हजार 939 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 188 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 26 लाख 82 हजारांच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 28 हजार रुग्णांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे.

त्यानंतर सर्वाधिक मृत्यू हे ब्राझीलमध्ये झाले आहेत. इथल्या कोरोना बळींची संख्या 60 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाबाधीत देशांच्यायादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. यात अमेरिका, ब्राझील, रशिया आणि भारत असा क्रम आहे.

भारतात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत 9 व्या स्थानावर आहे.

Updated : 2 July 2020 7:09 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top