जगातील कोरोना बळींची संख्या 3 लाखांच्या जवळ

Courtesy: Social Media

संपूर्ण जगातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 43 लाखांच्या वर पोहोचली आहे. जॉन हॉपकीन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार सध्या जगात कोरोनाचे 43 लाख 47 हजार 18 रुग्ण आहेत.

तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 97 हजार 197 वर पोहोचली आहे. यातील 84 हजार बळी हे एकट्या अमेरिकेत गेले आहेत, तर अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या ही 14 लाखांच्या जवळ पोहोचली आहे.

अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक रुग्ण हे रशियामध्ये आहेत, रशियातील सध्या कोरोनाचे 2 लाख 42 हजार 271 रुग्ण आहेत. तर अमेरिकेनंतर कोरोना बळींची सर्वाधिक संख्या ही ब्रिटनमध्ये असून तिथे 33 हजार 264 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाचे 2 लाख 30 हजार 985 रुग्ण आहेत.