Home > News Update > लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणार-आमदार तानाजीराव मुटकुळे

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणार-आमदार तानाजीराव मुटकुळे

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणार-आमदार तानाजीराव मुटकुळे
X

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे व हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथे आले आले असता , काही नागरिकांना मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने समाज भूषण पुरस्काराने आमदार तानाजीराव मुटकुळे व मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

यावेळी बोलताना हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून समाज बांधवांकडून तसेच अनेक सामाजिक संघटनांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी लावून धरली आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी बोलताना स्पष्ट केले.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार हे समाजासाठी दिशादर्शक ठरले आहे, त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा ही प्रत्येकाच्या मनातील भावना आहे. आणि त्यांना 'भारतरत्न' देऊनच त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होईल अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Updated : 29 Aug 2021 5:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top