Home > News Update > काश्मीरमधील बिहारी मजुरांना AK-47 द्या, भाजप आमदाराची मागणी

काश्मीरमधील बिहारी मजुरांना AK-47 द्या, भाजप आमदाराची मागणी

काश्मीरमधील बिहारी मजुरांना AK-47 द्या, भाजप आमदाराची मागणी
X

पाटणा : जम्मू -काश्मीरमध्ये बिहारी नागरिकांवर होणारे हल्ले आणि हत्यांच्या घटनांमुळे बिहारच्या लोकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. सरकार आणि विरोधी पक्षाचे नेते सतत याबाबत केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी करत आहे. आता बिहारमधील भाजपचे आमदार ज्ञानेंद्र ज्ञानू यांनी तर सरकारकडे एक वेगळीच मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील बाहेरील लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारने त्यांना एके -47 मोफत द्यावी, म्हणजे तो स्वतःचे रक्षण करू शकतील, असं ज्ञानेंद्र ज्ञानू यांनी म्हटले आहे.

जम्मू काश्मीरच्या बाहेरच्या लोकांना शस्त्र परवाना द्या अशी मागणी भाजप आमदाराने सरकारकडे केल्याने चर्चेला उधाण आले आहे. ज्ञानेंद्र ज्ञानू म्हणाले की , जम्मू-काश्मीर सरकारने बाहेरच्या लोकांना एके -47 पुरवावे, तरच परिस्थिती सुधारेल. काश्मीरमध्ये बिहारींवर होणारे हल्ले आणि हत्यांचा भाजप आमदार ज्ञानू यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी या घटनेला भ्याडपणा म्हटले आहे.

सोबतच दहशतवादी गरीब लोकांची हत्या करत आहेत. दररोज काम करुन पैसे मिळवणाऱ्या लोकांची हत्या करीत आहे. दहशतवादी पाकिस्तानच्या संगनमताने बिहारच्या जनतेला लक्ष्य केले जात आहे, त्यामुळे जम्मू -काश्मीरमधील घटनेवर केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदाराने केली आहे.

Updated : 21 Oct 2021 12:43 PM GMT
Next Story
Share it
Top