Home > News Update > BHR घोटाळ्यात माझे निकटवर्तीय: गिरीश महाजन

BHR घोटाळ्यात माझे निकटवर्तीय: गिरीश महाजन

BHR घोटाळ्यात माझे निकटवर्तीय: गिरीश महाजन
X

राज्यात गाजत असलेल्या BHR मल्टिस्टेट पतसंस्थे च्या दुसऱ्या घोटाळ्यात अनेक बड्या हस्तींना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये 12 जणांना समावेश आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह व्यापाऱ्यांचा समावेश आहे. BHR fraud case: 12 arrested as EOW conducts raids at

different locations या अटकेत भाजप चे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan relative In BHR Scam) यांचे मावस भाऊ जितेंद्र पाटील (Jitendra Patil) यांचा समावेश आहे तसेच जळगाव शहराचे भाजप आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांचे मेहुणे आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे (Vishnu Bhangnale) यांचे काका प्रसिद्ध व्यवसायिक भागवत भंगाळे, तसंच जामनेर भाजप शहराध्यक्ष छगन झालटे यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

माझे निकटवर्तीय महाजन यांची कबुली Girish Mahajan on BHR fraud case

भाजप चे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे हे सर्व निकटवर्तीय आहेत. महाजन यांनीही BHR प्रकरणात अटक झालेले माझे निकटवर्तीय असल्याची कबुली दिली आहे. मात्र, घोटाळ्याशी काही संबंध नाही असं देखील स्पष्ट केलं आहे. पतसंस्थेतून कर्ज घेतले, आणि त्यांनी ते फेडले. पोलिसांनी का अटक केली हे माहीत नाही? मात्र या प्रकरणाची त्याची चौकशी होतेय, मात्र भाजप च्या लोकांनाच का अटक केली जात आहे यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.

माझ्या अनेक चौकश्या, त्यांची ही करा - एकनाथ खडसे (Eknath Khadse On BHR fraud case)

BHR प्रकरणात कोण आहे माहीत नाही. मात्र, या प्रकरणात लहान मोठा कोणीही का असेना त्याची चौकशी झाली पहिजे, हा काही राजकीय विषय नाही. माझ्याही चौकश्या झाल्यात दोन वेळा अँटिकरप्शन, दोन वेळा इन्कमटॅक्स, एक वेळा लोकयुक्ताची, एका वेळा ATS , आणि आता ED ची चौकशी झाली. माझा राजकीय विषय होऊ शकत नाही असं ते म्हणतात. मग हा राजकीय विषय कसा असू शकतो. असा सवाल एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचं नाव न घेता केला आहे. Eknath Khadse on Girish Mahajan

BHR घोटाळ्याच्या चौकशी सुरू आहे आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची गरज पडली तर पोलीस कार्यवाही करतील असं पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे भाग्यश्री नवटक्के यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अटक सत्र अजून चालूच राहील असं बोललं जातंय, यात जळगाव जिल्ह्यातील एका आमदारांने घेतलेले कर्ज आणि कर्ज फेडीसाठी केलेली पावत्यांची सेटलमेंट हेही रडार वर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Updated : 19 Jun 2021 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top