News Update
Home > Election 2020 > 'छोटा राजन माझे भाऊ, त्यांचा उमेदवारीशी काहीही संबंध नाही'- दिपक निकाळजे

'छोटा राजन माझे भाऊ, त्यांचा उमेदवारीशी काहीही संबंध नाही'- दिपक निकाळजे

छोटा राजन माझे भाऊ, त्यांचा उमेदवारीशी काहीही संबंध नाही- दिपक निकाळजे
X

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी फलटण येथून कुख्यात गुंड छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजे (Dipak NIkalaje) यांना उमेदवारी जाहीर केली होती.

भाजपने रिपब्लिकन पक्षासाठी ६ जागा दिल्या होत्या त्यापैकी फलटण मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांना उमेदवारी जाहीर केलेली होती. मात्र, निकाळजे यांची उमेदवारी अचानक रद्द करुन दिगंबर आगवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याविषयी बोलताना दिपक निकाळजे यांनी "फलटणची उमेदवारी मीच नाकारली होती. माझा जनाधार हा चेंबूरला आहे त्यामुळे मला फलटणची उमेदवारी नाकारली गेल्याचा प्रश्नच उदभवत नाही." असं म्हटलं आहे.

'छोटा राजन (Chota Rajan) माझे भाऊ असून त्यांचा यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगत मागील निवडणुकीत मोदी, मुख्यमंत्री यांच्यासह एकाच व्यासपिठावर मी सुध्दा होतो' असंही त्यांनी म्हटलं आहे.

Updated : 4 Oct 2019 4:09 PM GMT
Next Story
Share it
Top