Home > News Update > मुंबईत एका महिलेवर सामूहिक बलात्कार

मुंबईत एका महिलेवर सामूहिक बलात्कार

मुंबईत एका महिलेवर सामूहिक बलात्कार
X

मुंबईतल्या कुर्ला रेल्वे स्टेशन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनच्या दरम्यान रस्त्यालगत एका महिलेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित महिला ही रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्टेशनवर उतरून मध्य प्रदेश जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसकडे पायी निघाली.

पण रस्त्यात साबळेनगर इथं झाडीमध्ये ती महिला लघुशंकेसाठी थांबली. त्याचवेळी तिथं लपलेल्या सोनू तिवारी आणि निलेश बारसकर यांनी महिलेला झाडीत खेचून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या ठिकाणाहून सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले हे आणखी दोन नराधम बाईकवरुन जात असताना त्यांनी या महिलेला मदत करण्याऐवजी तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्याकडे 3000 रुपये आणि मंगळसूत्रही खेचून घेतले आणि पळ काढला.

पण याच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका जागरुक महिलेनं पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती तातडीनं दिली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने दोन आरोपींना लगेच अटक केली. तर इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

Updated : 21 Jan 2020 8:23 AM GMT
Next Story
Share it
Top