Home > News Update > फ्यूचर ग्रूप Reliance कडे, मुकेश अंबानींचं 24 हजार 713 कोटींचं Big Bazaar डील

फ्यूचर ग्रूप Reliance कडे, मुकेश अंबानींचं 24 हजार 713 कोटींचं Big Bazaar डील

देशातील मोठी कंपनी असलेल्या रिलायंस आता रिटेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. रिलायंस ने फ्यूचर उद्योग समुहातील रिटेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. थोडक्यात काय आता बिग बाजारची मालकी रिलायंस कडे गेली आहे. आता य़ा 24 हजार 713 कोटीच्या डीलचा नक्की काय परिणाम होणार?पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

फ्यूचर ग्रूप Reliance कडे, मुकेश अंबानींचं 24 हजार 713 कोटींचं Big Bazaar डील
X

आर्थिक अडचणीत असलेल्या किशोर बियानी यांच्या फ्यूचर उद्योग समूहाची रिलायंस रिटेल ने खरेदी केली आहे. कोरोनाच्या काळात अडचणीत सापडलेल्या फ्यूचर उद्योग समुहाची रिलायंस रिटेल ने शनिवारी 24 हजार 713 कोटी रुपयांना खरेदी केली. फ्यूचर रिटेल या कंपनीकडे बिग बाजार पासून, फूड हॉल, निलगिरीज, FBB, Central, ब्रँड फॅक्टरी, हेरिटेज फूड हे सगळे रिटेल ब्रँड रिलायन्सकडे येणार आहेत. या व्यवहारानंतर रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड च्या संचालक ईशा अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रसिद्ध फ्यूचर ग्रुप चे नाव आम्ही बदलणार नाही. असं यावेळी त्यांनी जाहीर केले.

लॉकडाउन च्या दरम्यान फ्यूचर उद्योग समुहाचे अनेक स्टोअर्स बंद होते. फ्यूचर उद्योग समूहाचे 1800 पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत. रिलायन्स रिटेलकडे सध्या 11,784 स्टोअर्स आहेत. फॅशन, फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, प्रीमिअम फॅशन यापासून ते किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कनेक्टिव्हिटीपर्यंत सगळे उद्योग RIL च्या छत्राखाली आहेत.

त्यामुळं या उद्योग समुहाशी हजारो लोक जोडले गेलेले आहेत. या लोकांवर लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड पडण्याची शक्यता होती. मात्र, आता रिलायंस ने फ्युचर उद्योग समुह खरेदी केल्याने हजारो लोकांचा रोजगार वाचला आहे. रिलायन्स रिटेलची गेल्या वर्षातली उलाढाल 1,63,000 कोटी रुपये एवढी होती. आता नव्या करारांमुळे आणि नव्या कंपन्या जोडल्या गेल्यामुळे यात मोठी वाढ होणार आहे.

मात्र, रिलायंस सारख्या मोठ्या उद्योग समुहाला या क्षेत्रात का उतरावसं वाटलं? फ्युचर ग्रृपचा रिटेल बिझनेस रिलायंसच्या ताब्यात जाण्याचा नेमका अर्थ काय? रिलायंस ला का वाटलं या क्षेत्रात उतरावसं, यामुळे जीएसटी, मॉल यामुळे आधीच अडचणीत आलेला किराणा दुकानाचा उद्योग बंद पडेल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

रिलायंस जियो मध्ये जम बसवल्यानंतर मुकेश अंबानी आता रिटेल क्षेत्रात मोठी तयारी करुन उतरले आहेत. एका रिपोर्टनुसार रिटेल कंपनी वॉलमार्ट आणि रिलायंस मिळून रिटेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक करु शकतात. Morning Context च्या अहवालानुसार रिलायंस इंडस्ट्रीज सोबत या संदर्भात वॉलमार्ट ची बातचीत सुरु आहे. तज्ञांच्या मते रिलायंस रिटेल क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं म्हणजे रिलायंस ला या क्षेत्रात कंपनीचा विस्तार करुन अमेजॉन आणि डीमार्ट सारख्या कंपन्यांना टक्कर द्यायची आहे. या संदर्भात आम्ही अर्थतज्ञ अजय वाळिंबे यांच्याशी बातचित केली असता...

गेले काही महिने रिलायंस समुहाचे, मग ते रिलायंस जिओ असो किंवा सध्या चर्चेत असलेलं रिलायंस रिटेल यामध्ये जे मुसंडी मारतंय. याच्या संदर्भात नुकतंच एक मोठं डील भारतात झालं आहे. किशोर बियाणी यांचा फ्युचर ग्रृप मधील साधारण रिटेल होलसेल, लॉजीस्टिक या सर्वांचे असेट रिलायंस इंडस्ट्रीज जवळपास 27,500 कोटींना विकत घेत आहे. आता नक्की हे डील काय आहे?

या संदर्भात जर तुम्ही जाणकार असाल तर तुम्हाला गेल्या वर्षी Amazon ने फ्युचर समुहाच्या फ्युचर कुपन या कंपनीचा 49 टक्के शेअर खरेदी केले आहेत. या करारा मध्ये बियाणी यांना भविष्यात 3 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर शेअर विकत घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, अलिकडे फ्युचर समुहावर जे कर्ज वाढलं होतं. त्यामुळे त्यांना रिस्ट्रक्चर करणं शक्य़ दिसत नव्हतं. माझ्या मते याचा फायदा वेळेवर मुकेश अंबानी यांनी वेळेवर घेतला. आता फ्युचर ग्रृप आणि रिलायंस च्या झालेल्या करारा मध्ये रिलायंस Amazon ला बरोबर बाजूला केलं आहे. आणि तो या प्रकरणात तो फ्य़ुचर कुपनचा शेअर हॉल्डर राहू शकत नाही.

जे सध्या विकत घेतलं आहे. आता जे डील झालं आहे. त्या डील मध्ये त्यांची फ्युचर इंटरप्रायजेस नावाची जी कंपनी आहे. त्याच्यामध्ये फ्युचर रिटेल आणि बाकीच्या इतर कंपन्या त्यांचे असेंट्स हे फ्युचर रिटेलमध्ये असतील. आणि सप्लाय चेन आणि रिटेल business याचे दोन भाग करुन रिलायंस ला विकतील. थोडक्यात रिलायंस या प्रकरणात शेअर्स विकत घेत नाही. तर असेंट्स विकत घेत आहे. त्यामुळे रिलायंस कडे असेट्स असतील. शेअर विकत घेणार नाही. याचा परिणाम जर आपण पाहिला तर फ्युचर ग्रृपमध्ये त्यांच्या कंपन्या पाहिल्या तर बीग बाजार, फॅशनमध्ये आहे. फ्युचर इन्टरप्रायजेस मध्ये आहेत. फ्युचर सप्ल्याय चेन सोल्युशन मध्ये आहेत. अशा त्य़ांच्या कंपन्या आहेत.

आता हे सगळं आल्यानंतर संघटीत रिटेल चा जर आपण विचार केला असता आता ते 700 billion Doller आहे. आणि ते 2025 मध्ये म्हणजे पुढील पाच वर्षात 1.3 ट्रिलियन डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे भारताची लोकसंख्या आणि लोकांना मॉल मध्ये जाण्याची लागलेली सवय. त्यामुळे याची ग्रोथ निश्चित आहे. याचा बरोबर फायदा रिलायंस ने उचलला आहे. आता ही कंपनी जिओ प्रमाणेच बलाढ्य होईल. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता ही डील झाल्यानंतर फ्युचर कंपनीकडे काय उरतंय? फुड आणि फॅशन्स, इन्शुरन्स आणि टेक्सटाइल क्षेत्र, त्यांच्याकडे राहील. सुरुवातीला प्रेफेशन म्हणून रिलायंस 1600 कोटीचे शेअर्स विकत घेणार आहे. मात्र, रिलायंस ने असेट विकत घेऊन जी खेळी खेळली आहे. त्यामुळं Amazon या डील मुळं वेगळं राहिल. Amazon ऑनलाईन सेक्टरमध्ये कायम राहिल की नाही. हे सध्या सांगता येत नाही. मात्र, रिलायंस या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करेल हे निश्चित...

मात्र, या व्यवहाराचा छोट्या दुकानदारांच्या व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही. असं मत अजय वाळिंबे यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलं आहे

Updated : 1 Nov 2020 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top