Home > News Update > इंधन दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग

इंधन दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सलग बाराव्या दिवशी वाढ झाली आहे. इंधनाचे दर प्रत्येकी ४० पैशांनी वधारले आहेत. त्यामुळंमुंबईत आज पेट्रोलचा दर ११८. ८३ प्रति लीटर आहे. तर, डिझेलने मुंबईत शंभरी गाठली आहे. डिझेल मुंबईत १०३. ०७ रुपये प्रति लीटर पोहोचले आहे. देशातील चारही प्रमुख शहरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल- डिझेल अधिक महाग आहे.

इंधन दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग
X

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सलग बाराव्या दिवशी वाढ झाली आहे. इंधनाचे दर प्रत्येकी ४० पैशांनी वधारले आहेत. त्यामुळंमुंबईत आज पेट्रोलचा दर ११८. ८३ प्रति लीटर आहे. तर, डिझेलने मुंबईत शंभरी गाठली आहे. डिझेल मुंबईत १०३. ०७ रुपये प्रति लीटर पोहोचले आहे. देशातील चारही प्रमुख शहरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल- डिझेल अधिक महाग आहे.

२२ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत चौदा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. २१ मार्चला पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९५.४५ रुपये होता. मात्र, १४ दिवसांच्या कालावधीत सुमारे आठ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसंच, डिझेलच्या दरातही ७ रुपये वाढ नोंदवण्यात आली आहे.

देशातील आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारातील किमतींनुसार इंधन तेलाच्या देशांतर्गत किमती दररोज बदलेल्या जातात. हा नियम 2017 मध्ये लागू झाला. तेव्हापासून, देशातील प्रत्येक इंधन केंद्रावर दररोज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू होणार आहेत. केंद्र आणि राज्याची कर रचना वेगळी असल्याने, स्थानिक व्हॅट आणि इतर करांमुळे इंधन तेलाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलर प्रति बॅरल इतका आहे. त्यामुळेच भारतात इंधन दरात वाढ होत आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत आज (सोमवारी) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पेट्रोलचे दर प्रति लिटर 118.83 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलनं उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबई डिझेल 103.07 प्रति लिटरवर पोहोचले आहेत. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 40-40 पैसे प्रति लिटरची वाढ झाली आहे. त्यासोबतच दिल्लीमध्ये आता पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 लिटरवर पोहोचलं आहे.

28 मार्च रोजी पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी वाढले. 29 मार्च रोजी पेट्रोल 80 पैशांनी आणि डिझेल 70 पैशांनी वाढले, 30 मार्चला पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आणि 31 मार्चला पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले. तर 1 एप्रिल रोजी कोणताही बदल झाला नाही. त्यानंतर 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजीही पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे.

14 दिवसांत 12 टप्प्यांमध्ये पेट्रोलच्या दरात अनुक्रमे 80, 80, 80, 80, 50, 30, 80, 80, 80, 80, 80 आणि 40 पैशांची वाढ झाली आहे. अशाप्रकारे पेट्रोल 8 रुपये 40 पैशांनी महागले आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर 118 रुपयांच्या पुढे

इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नंने जारी केलेल्या ताज्या दरांनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 04 एप्रिल 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 118.83 रुपये झाला आहे. तर डिझेलचा दर 103.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, स्थानिक करांवर अवलंबून, राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये 100 रुपयांच्या पुढे डिझेल विकले जात आहे.

Updated : 4 April 2022 4:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top