Home > News Update > #PegasusSnoopgate – पत्रकारांवर पाळत, एका देशात तातडीने चौकशीला सुरूवात

#PegasusSnoopgate – पत्रकारांवर पाळत, एका देशात तातडीने चौकशीला सुरूवात

#PegasusSnoopgate – पत्रकारांवर पाळत, एका देशात तातडीने चौकशीला सुरूवात
X

पेगॅसिस स्पायवेअऱद्वारे जगभरातील अनेकांवर पाऴत ठेवली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये भारतात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, 2 केंद्रीय मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माजी निवडणूक आयुक्त या सगळ्यांवर पाळत ठेवली गेल्याचा दावा द वायरने आपल्या वृत्तात केला आहे. याचे तीव्र पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. सरकारने अशी कोणतीही हेरगिरी केली नसल्याचे स्पष्ट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे.

एकीकडे भारत सरकारने अशाप्रकारे हा गंभीर प्रकार उडवून लावला असताना फ्रान्स सरकारने मात्र या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. AFP या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. इस्त्रायलमधील NSO या कंपनीने पेगॅसिस स्पायवेअऱ द्वारे अनेकांचे फोन हॅक करुन त्यात घुसखोरी केली आणि त्या लोकांवर पाळत ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या कंपनीचा डाटा लिक झाला आणि तो फ्रान्समधील Forbidden Stories या संस्थेने जगभरातील काही माध्यमांना दिल्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

यामध्ये भारताप्रमाणेच फ्रान्समधीलही काही पत्रकारांवर पाळत ठेवली गेल्याचा प्रकार घडला आहे. फ्रान्सच्या सरकारने तिथल्या सायबर क्राईम विभागाकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. फ्रान्समधील सुमारे 1 हजार लोकांवर पाळत ठेवली गेल्याचे उघड झाले आहे यामध्ये 30 पत्रकारांचा समावेश आहे.

हे स्पायवेअर तयार करणाऱ्या NSOकंपनीने मात्र पाळत ठेवल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे. तसेच आपले ग्राहक हे केवळ अधिकृत सरकारं असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ज्या ज्या देशांमधील लोकांवर पाळत ठेवली गेली, त्या देशांमधील सरकारांवर संशय व्यक्त होत आहे. पण फ्रान्स सरकारने यामध्ये चौकशीला सुरूवात करुन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय़ घेतला आहे.

Updated : 20 July 2021 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top