Home > News Update > Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना शिवाजी पार्क परिसरात त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे.

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला
X

Sandeep Deshpande : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेल्या संदीप देशपांडे हे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला (Morning Walk) गेले असताना त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टंपने हल्ला झाला आहे. त्यानंतर संदीप देशपांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Attack on Sandeep) मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी चार अज्ञात व्यक्तींनी येऊन त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टंपने हल्ला केला. यानंतर संदीप देशपांडे यांनी हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांना हिंदूजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यामुळे हा हल्ला पाळत ठेऊन केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संदीप देशपांडे यांनी युवासेनेचे पदाधिकारी वैभव थोरात (Vaibhav Thorat) यांच्यावर महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना अनेकदा धमकीचे फोन आले असल्याची चर्चा आहे. कोण आहेत संदीप देशपांडे? (Who is Sandeep Deshpande) संदीप देशपांडे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना भारतीय विद्यार्थी सेना येथून केली. त्यांना महाविद्यालयीन निवडणूकांमध्ये संधी दिल्यानंतर ते विजयी झाले. पुढे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत संदीप देशपांडेही बाहेर पडले. पुढे संदीप देशपांडे हे मनसेचे सरचिटणीस झाले. सध्या संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Updated : 3 March 2023 3:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top