Home > News Update > पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट ; पुजा कावळे हत्याकांड प्रकरणात चार आरोपी जेरबंद

पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट ; पुजा कावळे हत्याकांड प्रकरणात चार आरोपी जेरबंद

पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट ; पुजा कावळे हत्याकांड प्रकरणात चार आरोपी जेरबंद
X

यवतमाळ // दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचे प्रेत संपूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले होते. दरम्यान घटनेचा उलगडा झाला असून कौटूंबिक वाद व स्थावर मालमत्तेसाठी पतीनेच पत्नीच्या खुनाचा कट रचून ठार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पुजा कावळे पुणे येथे जाण्यासाठी निघाली. परंतु, पुणे येथे पोहचली नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान दिग्रस तालुक्यात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

पुजा अनिल कावळे रा. बाई गौळ ता. मानोरा जि. वाशिम असे मृत महिलेचे नाव आहे.या प्रकरणात पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. उज्वल पंढरी नगराळे रा. राळेगाव, गौरव रामभाऊ राऊत रा. कळंब, अभिषेक चयन म्हात्रे रा. शिंदी बु. ता. अचलपुर जि. अमरावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी याबाबत पुढील तपास सुरू केला आहे.

Updated : 21 Nov 2021 5:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top