Home > News Update > सच्चा दोस्त आणि इमानदार साथी गमावला: बराक ओबामा

सच्चा दोस्त आणि इमानदार साथी गमावला: बराक ओबामा

सच्चा दोस्त आणि इमानदार साथी गमावला: बराक ओबामा
X

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्या घरातील एक सदस्याचं कॅन्सरने निधन झालं आहे. बराक ओबामा यांचं त्यांच्या कुत्र्यावर खूप प्रेम होतं. त्याचं नाव 'बो' असं होतं. बोचं कॅन्सरने निधन झालं. या संदर्भात ओबामा यांनी ट्वीट केलं आहे.

ओबामा आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात...

आज आमच्या परिवारातील एक खरा मित्र, आणि एक साथीदाराला आम्ही गमावलं आहे. एका दशकापेक्षा अधिक वेळ तो आमच्या सोबत होता. 'बो' ची आमच्या जीवनात उपस्थिती महत्त्वाची होती.

मागील एका दशकांपासून तो आमच्या जीवनात होता. ओबामा यांनी आपल्या मुलींना मालिया आणि साशाला आश्वासन दिलं होतं की, 2008 च्या निवडणुकानंतर ते एक कुत्रा तिला आणून देतील. त्यानुसार त्यांनी व्हाइट हाऊस मध्ये हा कुत्रा आणून दिला होता. त्यानंतर बो त्यांच्या कुटुंबाचा सदस्य झाला होता.

Updated : 9 May 2021 6:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top