Home > News Update > मनमोहन सिंह यांना कोरोना

मनमोहन सिंह यांना कोरोना

मनमोहन सिंह यांना कोरोना
X

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. सध्या मनमोहन सिंह यांच्यावर एम्‍स रुग्णालयातील ट्रामा सेंटर मध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

अलिकडेच मनमोहन सिंह यांनी कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सल्ला दिला होता..

मनमोहन सिंह कोरोना झाल्याचं समजताच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं असून या ट्वीट मध्ये तुम्ही लवकर बरे व्हा! देशाला या कठीण काळात तुमच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची गरज असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Updated : 19 April 2021 1:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top