News Update
Home > News Update > माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वर्धा शहरातील सफाई कामगारांचा सत्कार

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वर्धा शहरातील सफाई कामगारांचा सत्कार

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वर्धा शहरातील सफाई कामगारांचा सत्कार
X

कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची परवा न करता, कुठलीही भीती न बाळगता आपले कर्तव्य बजावणारे वर्धा शहरातील सफाई कामगार यांचा सत्कार महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला, हा सत्कार सोहळा कार्यक्रम बॅचलर रोडवरील हेरिटेज हॉटेल येथे पार पडला.

या सत्कार सोहळा कार्यक्रमाला भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ,शिरीष गोडे , खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर,राजेश बकाने, सुरेश वाघमारे, प्रदीपसिंग ठाकूर, नगराध्यक्ष अतुल तराळे,प्रदीप बुर्ले,प्रतिभा बुरले, पवन परियाल, निलेश किटे,जयंत कावळे उपस्थित होते.

यावेळी वर्धा शहरातील सफाई कामगारांचे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशगौरव नरेंद्र मोदी या दोघांनी सांगितले आहे की, देशासाठी समर्पित भावनेतून काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा सन्मानाचा अधिकारी आहे, असाच पद्धतीने कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समर्पित भावनेतून काम करणाऱ्या सफाई कामगारांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सन्मान होणं हा उत्तम योगायोग आहे . त्यांच्या कार्याला मी आज नमन केले. अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 3 Oct 2021 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top