Home > News Update > मोदी सरकारने आणखी एक निर्णय फिरवला

मोदी सरकारने आणखी एक निर्णय फिरवला

मोदी सरकारने आणखी एक निर्णय फिरवला
X

एकीकडे देशात गेल्या काही वर्षात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका निर्णयामुळे देशात वाद निर्माण झाला आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांच्या संस्थेसह सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना परदेशी देणग्या स्वीकारण्यास केंद्राने मनाई केली होती. या संस्थांनी अटींची पूर्तता न केल्याने त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले होते.

पण आता केंद्रीय गृहमंत्रालयाने आपला निर्णय फिरवला आहे. मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची परदेशी देणगी नियमन कायद्यानुसार (FCRA) रद्द करण्यात आलेली नोंदणी केंद्र सरकारने गुरुवारी पुन्हा नियमित केली आहे. आता परदेशी देणगी स्वीकारण्यासाठी मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेला मिळालेली परवानगी डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे.

याआधी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे २५ डिसेंबर रोजी मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेच्या FCRA अंतर्गत परवान्याचे नुतनीकरण करायला नकार दिला होता. तसेच यावरुन टीका झाल्यानंतर संस्थेने अटींची पूर्तता न केल्याने परवान्याचे नुतनीकर करण्यास नकार दिल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्रालयाने दोन दिवसांनी दिले होते. पण आता सरकारने आपला निर्णय फिरवला आहे.

Updated : 9 Jan 2022 3:56 AM GMT
Next Story
Share it
Top