Home > News Update > नियम पाळा, नाहीतर लॉकडाऊन अटळ पुणे-पिंपरी चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतची मुदत : अजित पवार

नियम पाळा, नाहीतर लॉकडाऊन अटळ पुणे-पिंपरी चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतची मुदत : अजित पवार

नियम पाळा, नाहीतर लॉकडाऊन अटळ  पुणे-पिंपरी चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतची मुदत : अजित पवार
X

जागतिक महामारी कोरोनाच्या लाटेनं महाराष्ट्रात धुमाकुळ घातला असताना पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल", असं इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज दिला आहे.

पुणे आणि पिंपरीचिंचवड मधील परीस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. काही दिवशी हा आकडा मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.

"आजही काही भागात जनतेच्या मनात सुरुवातीला जी भिती होती ती राहिलेली नाही. आजच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना विचारलं आहे की लसीकरणाची ३१६ केंद्र दोन्ही शहरांत आहेत, ती दुप्पट करू शकतो का? तसं केलं तर लसीकरणाचा कार्यक्रम पुण्यात सर्वात जास्त घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करता येईल. त्यावर प्रकाश जावडेकरांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे", असं अजित पवार यावेळी म्हणाले.

"बेडची संख्या वाढवण्याचं काम, लसीकरणाचा वेग ३०० वरून ६०० केंद्रांपर्यंत नेण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी लसीचे डोस कमी पडतील की काय, ही बाब केंद्रीय मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आहे. लसीचे अतिरिक्त डोस पुरवण्याची मागणी केली आहे. प्रकाश जावडेकरांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे", असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. "घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल", असं अजित पवार म्हणाले आहेत.

यानंतर बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय २ एप्रिलसंदर्भात घेण्यता आला. "लॉकडाऊन केला, तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आवाहन करत आहोत. तो होऊ द्यायचा नसेल, तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झालाय हे खरं आहे. पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. २ एप्रिलपर्यंत तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा", असं अजित पवार यावेळी म्हणाले.

पुण्यात नवे नियम लागू?

१) खासगी रुग्णालयात सुरुवातीच्या काळात ८० टक्के बेड घेतले होते, आता ५० टक्के बेड करोनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

२) १ तारखेपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद केले पाहिजेत.

३) शाळा-महाविद्यालयं ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.

४) मॉल, चित्रपटगृहांसाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम असेल. सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील.

५) लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक संख्या अजिबात नकोय. अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी असेल. हे सगळे निर्णय नाईलाजास्तव घ्यावे लागले आहेत.

६) सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू राहतील, नंतर ते बंद असतील.

Updated : 26 March 2021 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top