Home > News Update > भीमा कोरेगाव विजयस्तंभाला जाताना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

भीमा कोरेगाव विजयस्तंभाला जाताना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

भीमा कोरेगाव विजयस्तंभाला जाताना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
X

भीमा कोरेगाव विजयस्तंभाला जाताना आंबेडकरी समाजाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोना नियमाचे पालन करावे तसेच कमीत कमी भीमसैनिकांनी जाऊन विजयस्तंभास मानवंदना दयावी, असे आवाहन आरपीआयच्या सचिन खरात यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने जातात. पण गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्वांनी चैत्यभूमी, दिक्षाभूमी येथे गर्दी न करता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याही वर्षी ओमीक्रोन पसरत आहे, त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोना नियमाचे पालन करून आणि कमीत कमी भीमसैनिकांनी भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभास अभिवादन करावे असं आवाहन सचिन खरात यांनी केले आहे.


Updated : 2021-12-31T17:05:08+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top