Home > News Update > चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा; सीबीआय कोर्टाचा निर्णय

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा; सीबीआय कोर्टाचा निर्णय

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा; सीबीआय कोर्टाचा निर्णय
X

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने दणका दिला आहे.डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे.न्यायालयाने त्यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह ६० लाखांचा दंडही ठोठावला आहे.या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लालू प्रसादांच्या वकीलांनी सांगितले आहे.

चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात आली आहे. न्यायालयाने ५ वर्षांच्या शिक्षेसह ६० लाख रुपयांचा दंडही ठोठावला.आता न्यायालयाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांच्या वकीलांनी सांगितले.तिथे लालुंसाठी जामीन अर्ज दाखल केला जाईल.लालूप्रसाद यांनी अर्धी शिक्षा भोगली आहे.असा युक्तीवाद केला जाईल. आम्ही न्यायालयात प्रकृती अस्वास्थाचे कारण दिले होते,असे वकील म्हणाले.सध्या लालू ७३ वर्षांचे आहेत.

लालू यादव यांच्यासह याप्रकरणातील ३८ दोषींनाही सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली.१५ फेब्रुवारीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी यांनी या सर्वांना दोषी ठरवले आणि शिक्षेवरील सुनावणीसाठी २१ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती.

या प्रकारणात सीबीआयने एकुण १७० आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते,तर २६ सप्टेंबर २००५ ला १४८ आरोपींवर आरोप निश्चित करणयात आले होते.चार वेगवेगळ्या चारा घोटाळा प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह ९९ जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाल्याने २९ जानेवारीला आपला निकाल राखुन ठेवला होता.

Updated : 21 Feb 2022 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top