Home > News Update > राज्यात महापुरात 169 मृत्यू , 1 जण बेपत्ता, तर 55 जण जखमी ; आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहीती

राज्यात महापुरात 169 मृत्यू , 1 जण बेपत्ता, तर 55 जण जखमी ; आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहीती

राज्यात महापुरात 169 जणांचा मृत्यू , 1 जण बेपत्ता, तर 55 जण जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यात महापुरात 169 मृत्यू , 1 जण बेपत्ता, तर 55 जण जखमी ; आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहीती
X

राज्यात महापुरात 169 मृत्यू झाले असून, 1 जण बेपत्ता आहे, 55 जण जखमी आहे. केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नाही तर अमरावती, अकोला, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे रस्त्यांचे साधारण आठशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, विद्युत विभागाचे चारशे कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

अजून सर्व ठिकाणी पंचनामे व्हायचे आहे, पंचनामे तातडीने करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. चिपळूण, महाड, खेड, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाला आहे.

याबाबत पंचनामे पुर्ण झाल्याशिवाय , नुकसानीचा एकुण आकडा आल्याशिवाय आपण मदतीचा निर्णय घ्यायचा नाही अशी चर्चा काल झाली आणि तातडीनं दहा हजार रुपये, सोबत काही धान्य हे पूरबाधितांनी लगेच दिले जाणार आहे. अशीही माहिती त्यांनी दिली. सोबतच मदतीची 10 हजाराची रक्कम थेट बाधितांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही असं वडेट्टीवार यांनी सांगितले.

Updated : 29 July 2021 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top